Me Sahyadri January 2018 b

/ Sahyadri Geographic by Vivek Kale
 

 
 


 

Me Sahyadri
January 2018
Volume 5, number 2, # 56
Mysteries of Maval Caves – Khadakwadi Cave
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to Balasaheb Yelwande, Santosh Dahibhate and all those who helped me during the compilation and for the help and guidance during the activity.
 
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
As the economic development has taken the center stage, the balance between the environmental sustenance and socio economic development will be under the scanner. As most experts with balanced views have proclaimed, Indian wildlife and ecological system sustenance will be under threat, unless precautions are taken with the help of appropriate research and long term national interests. As we encounter the economic development, many habitats which indirectly or directly help sustainable development will be damaged. The awareness to gauge the success by sustainable development and not by year to year growth is a distant dream any environmentalist will assume in current scenario.
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and man made monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be left untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal, Me Sahyadri Magazine.
 

 

““
 
Me Sahyadri – January 2018 - B
 
मावळ लेणी मोहेमेचा सारांश :
मावळातील भाजे, बेडसे आणि कार्ले लेणी अप्रतिम आहेत. त्यामुळे या भागातील इतर लहान लेण्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. आम्ही चार समविचारी मित्रांनी मात्र या हरवलेल्या लेण्यांची शोधाशोध करण्याचे ठरवले. साईप्रकाश बेलसरे, निनाद बारटक्के, अमेय जोशी आणि विवेक काळे असा संघ तयार झाला. एकोणीसाव्या शतकात जेम्स बर्गेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी भारतातील लेणी धुंडाळली. त्यांनी १८८० साली "केव्ह टेम्पल्स ऑफ इंडिया" या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात मावळातील लहान लेण्यांचा फारसा तपशिल नसला तरी, या मावळातील इतर लहान लेण्यांबद्दल ५-६ वाक्यांमध्ये आम्हाला त्रोटक का होईना माहिती मिळाली. त्यांनी उल्लेख केलेली, काही ठिकाण सापडली, तर काही ठिकाण काहीही केल्या सापडेनात. कदाचित न सापडलेली ठिकाण नष्ट झाली असावीत. पण मोहिमे दरम्यान नविन, ज्या ठिकाणांचा पुस्तकात उल्लेख नव्हता, पण ग्रामीण भागातल्या स्थानिकांना माहिती होती अशी ठिकाण सापडली. जेम्स बर्गेस आणि जेम्स फर्ग्युसन या दोन इंग्रज विद्वानांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा धागा म्हणुन वापर करायचे ठरले. कामांचे वाटप झाले.
शोध मोहिमेत लागणाऱ्या खाऊची सोय करणे, विषय आणि ठिकाणाचा आधी अभ्यास करणे, प्रवासाची सोय करणे, गावकऱ्यांकडे लेण्यांबद्दल चौकश्या करणे, मोहिमे दरम्यान गचपणातुन वाट शोधणे, लेण्याच्या अवशेषांची मोजमाप घेऊन त्याची चित्रे/नकाशे काढणे, छायाचित्रे काढणे, जि. पि. एस. यंत्रावर वाटेबद्दल माहिती नोंदवणे, लेण्यात लहान बारकावे शोधणे, लेण्यांचे विश्लेषण करणे, नोंदी करणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची काम वाटुन घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी जाताना, घरचा अभ्यास करावा लागला. जुनी पुस्तके, नकाशे धुंडाळले गेले. गावातल्या मित्रांची मदत झाली. गावागावात चौकश्या केल्या. गडद, लेणे, गुहा, कपार, भोगदा, विहार, पांडवांनी एका रात्री बनवलेली गुहा असे अनेक शब्द वापरुन चौकश्या झाल्या. बहुतेक वेळा असे काही नाही इथे ! तुम्ही कुठुन आलात ? असे उत्तर मिळाले. लेणे आहे का इथे कुठे असा प्रश्न विचारला तर आम्हाला बहुतेकांनी कार्ले/बेडसे/भाजे लेण्यांचा पत्ता दिला. पण बकऱ्या, गाई घेऊन डोंगरात फिरणारे गुराखी मात्र दरवेळेला मदतीला धाउन आले. वाटांचे आणि दिशांचे अंदाज मिळाले. जुजबी माहिती घेऊन ठिकाण शोधणे या प्रकाराचा चांगला सराव झाला. कधी काटेरी करवंदींच्या खालुन खुप सरपटाव लागल तर कधी घसाऱ्यावर हात टेकावे लागले. लेण्यांमध्ये मोठे कोळी (स्पायडर), कातळ पाली, वटवाघळ, मधमाश्या, पाकोळ्या, घुबडं भेटले. आमच्या मुळे त्यांना उगाच त्रास झाला, असा अपराधीपणा वाटला. प्रत्येक शोधमोहिमेला यश आलेच असे नाही. काही ठिकाण सापडली नाहीत. तर काही ठिकाण आमच्याच मनाचे खेळ आहेत असे लक्षात आले. बहुतांश ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारची जोखिम होती. वटवाघळ, लेण्यातील धुळ, काळोख, मधमाश्या, काटेरी वनस्पती, घसारा, गुहेतील ऑक्सिजन चा अभावआणि इतर न दिसणारे धोके यावर मात झाली. मोहिमेसाठी, विजेऱ्या, जि. पि. एस., मोजपट्या, दोऱ्या, लेजर यंत्र, नकाशे, गुगल मॅप, जाळीच्या टोप्या या सर्व जंत्रीचा उपयोग झाला. एकूण मिळुन २० नविन अपरिचित ठिकाण/वास्तु पहायला मिळाल्या, मावळाचा भुगोल जरा अजुन नीट लक्षात आला. नविन प्रश्न पडले आणि नविन कोडी सोडवयाला मिळाली. तर्क वितर्क झाले.
About the Maval Cave exploration :
The main caves in Maval region are so significant that other small hermit caves are often overlooked. We as a team of four like minded friends, decided to explore the Maval region for these small hermit caves. We explored and found few beautiful places. The very concept of creating a hermit cave somewhere high up in the hills is fascinating. These places often are full of tranquility and nothing else. With very little architectural evidences and clues, the academicians have obviously ignored these places. It was James Fergusson and James Burgess, during their exhaustive study of “Cave temples of India, 1880” mentioned few of these hermits in Maval region of Pune district. With the little clues and exhaustive investigation, team of four members, Saprakash Belsare, Amey Joshi, Ninad Bartakke and Vivek Kale started the exploration. The journey to locate, trek and analyse these hermit caves itself was fascinating. We met many villagers who were unaware of these places, but also met few shephards who were precisely aware of the hermits and gave us tentaive guidance.
There is a very brief mention about the misceleneous caves of Maval by James fergusson and James Burgess in their work. Based on available information we decided to search these caves and monuments. The activities were planned. The food, travel , track exploration in difficult and routes full of foliage, enquiring the villagers about the caves, taking measurements and drawing skecthes and maps, photography, GPS data collection, making notes and analysing the information, observing the minor details of the caves etc activites were distributed amongst the team members. We met many bats, owls, geckos, lizards, large spiders, martins, honeybees during the treks. Often we felt sad that we disturbed them to see the caves. Most of these places are hazardous due to pitch darkness, bats, dust, thorny plants, honeybees, low oxygen level in caves and rock patches etc. Not all the attemps were successful. Sometimes we could not find the intended places and sometimes we realised that the cave was just our imagination and did not exist. Nevertheless we saw about 20 new strange caves/monuments during the exploration. The high intensity torches, GPS tool, measuring tapes and measuring laser tool, Honeybee protection caps, maps, google maps, photographs etc were useful during the mission. On this photoessay, I have compiled the information and photographs of one of the new find (for us) at Khadakwadi. Special thanks to Santosh Dahibhate for giving us the small clue to this amazing partially collapsed, simple but questions-thrower cavern cave.
 

 

““ 
The banner has been published here to improve the awareness of the trekkers and tourists visiting the various mountain forts, mountains in north western ghats. Please avoid accidents, by following good outdoor ethics such as no swimming in cisterns at mountain forts, no rock climbing without proper technical equipment and expertise. Please do not adventure, trek with any group or individually without understanding the risks associated. The frequency of the solo trekker fatalities have increased recently. Please strictly avoid solo treks. Please also avoid treks to mountains in large commercial groups, as it leads to damage to biodiversity of these high elevation ecological islands. Please respect the wildlife and biodiversity of the region. This has become more important as the ever increasing human interference is leading to severe damage to fragile ecosystems. Please be aware of the wildlife and biodiversity of the mountains before visiting these mountains. Please follow outdoor ethics. Follow ASI and Forest department rules. The concept of use of symbols for outdoor ethics was conceived and designed by "Sahyadri Trekker Bloggers Group".
 
 

 

 
1. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
पुणे जिल्ह्यात, मावळ तालुक्यात कार्ले, भाजे आणि बेडसे येथे डोंगरांवर दगडात कोरलेली लेणी आहेत. मावळात या भागात, इतरत्र सुद्धा लहान विहार आणि लेणी आहेत. यातील एक लहान अपरिचित पडके लेणे बेडसे लेण्याजवळ, दक्षिणेला खडकवाडी गावाजवळ डोंगरात आहे. याचा अभ्यास झालाय असे वाटत नाही. कदाचित अभ्यास झाला असेल. जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गेस या इंग्रज विद्वानांनी भारतातील लेण्यांचा रितसर अभ्यास करुन केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया शीर्षकाचे पुस्तक १८८० साली प्रकाशित केले. त्यांनी नमुद केलेल्या मावळातील लहान लेण्यांमध्ये खडकवाडीचा उल्लेख आढळत नाही.
Around the famous Karle, Bhaje and Bedse Caves in Maval Tehsil of Pune district there are many smaller hermit caves in the hills. One of the interesting wonderful hermit is located in the hill near village called as Khadakwadi. This cave is not so well known and is not probably studied and documented. James Fergusson and James Burgess the noted explorers of Buddhist rock cut caves, around Pune has not mentioned about this place in his book “Caves temples of India (1880)”.
 

 

 
2. Khadakwadi cave map, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
खडकवाडी गाव महाराष्ट्र राज्यात, पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात पवन मावळात वसलेले आहे. दोन लहान डोंगर रांगांच्या मध्ये हे गाव वसलेले आहे. आजुबाजुच्या खडकाळ जमिनीवरुन खडकवाडी असे नाव पडले असावे. मावळात रिहे, आंधळे नावाची दोन गाव आहेत. या गावांच्या भवताली दोन जुळ्या समांतर डोंगररांगा आहेत. यातील एक डोंगररांग माण गावापासुन वायव्येकडे ज्ञानपुरीच्या मांडवी डोंगरापर्यंत तर दुसरी डोंगररांग घोटवडे गावापासुन वायव्येकडे ज्ञानपुरीच्या मांडवी डोंगरापर्यंत पोहोचली आहे. या दोन रांगा मांडवीच्या डोंगराला एकत्र आल्या आहेत. मांडवी पासुन पुन्हा या डोंगरांना शाखा फुटल्या आहेत. एक शाखा पश्चिमेकडे तिकोना किल्याकडे तर दुसरी शाखा पुर्वेकडे छोटी आणि मोठी सुळुक या जोड गोळीकडे , पवनेकाठी आर्डव गावापर्यंत पसरली आहे. यातील छोटी सुळुक आणि मोठी सुळुक या डोंगरांच्या भागात डोंगरात खडकवाडी कपार-लेणे आहे. याच भागात येळघोळ गावाच्या पश्चिमेला डोंगराच्या कुशीत धबधब्याजवळ एक नैसर्गिक कपारीत येळघोळ कपार लेणे आहे. येळघोळ कपार लेणे बौद्ध लेणे आहे, हे येथील स्तुपावरुन स्पष्ट होते. खडकवाडी कपार लेणे येळघोळ कपार-लेण्याच्या उत्तरेकडे अंदाजे २.५ किमी अंतरावर संमांतर डोंगरावर आहे.
Khadakwadi is a village in Maval Taluka in Pune district in the state of Maharashtra in India. The village is located at the base of the hill range on the Deccan plateau. There are two small twin hill ranges in Maval which flank, Rihe and Andhale villages. These twin hill ranges combine together at Mandvi hill. There are two extensions to this range. The west extension has Tikona fort. The east extension has twin hills called Mothi Sulak (literal meaning in Mararthi : Large pinnacle) and Choti Sulak (literal meaning in Mararthi : Small pinnacle). The hill range between Mothi and Choti Sulak is extended to north in Pawana river basin. This region is called as Pawana river basin, Pawana Maval. In Pavana Maval, there are known caves at Bedse, Tikona and Yelghol. The caves at Bedse and Yelghol are known Buddhist caves. Khadakwadi cave is also located in Pavana Maval and is not commonly known.
 

 

 
3. Khadakwadi cave map, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
4. Khadakwadi cave map, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
5. Khadakwadi elevation chart, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
6. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
7. Bench, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
8. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
खडकवाडी गावाच्या गाडीवाटेच्या पुर्व दिशेला, गावाच्या पातळीपासुन अंदाजे ८०-९० मीटर उंचीवर डोंगरावर धबधबा आहे. येथे एक नैसर्गिक कपार तयार झाली आहे. कपार अंदाजे ११ मीटर रुंद, ५.५ मीटर लांब, आणी ३ मीटर उंच आहे. कपारीच्या पुढील भागात धबधबा आहे. येथील दगड ठिसुळ असुन त्याला भेगा आहेत. कपारीच्या आत मागच्या भिंतीमागे, लहान दगड आणि दगडा दगडा अध्ये पोकळ्या अशी नैसर्गिक रचना आहे. खोदायला सोपे जाईल म्हणुन मुळ कपारीचा वापर लेणे बनवण्यासाठी केला आहे. लेण्यासमोर पाण्याच्या प्रवाहात लहान मोठया कोसळलेल्या शिळा पडलेल्या आहेत.
Cavern: The natural cavern is located on the Khadakwadi hill at about 690 meter above mean sea level. The cavern is about 11 meter wide and 5.5 meter deep, from front to back crevice wall. At the front the cavern is about 4 meter in height. There are chisel marks on the ceiling. The ceiling is irregular and is not flat. The part of the back of the cave is chiselled to make a flat vertical walls. The rest of the back of the cave has deep crack with voids in the crack, which are natural. The backside crack has natural structure with lots of voids and rocks. There is a poll hole on the bench. At northern side of the cavern there is a evidence of a rectangular cutting of the rock, which probably may have been a water tank.
 

 

 
9. Khadakwadi cave layout, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
खडकवाडीच्या कपार-लेण्यात एकुण पाच मानवनिर्मित उपघटक आहेत. तेथे २ बैठका (बाक), एक अर्धवट मोडकी बैठक (बाक), एका दंडगोलाकृती लेण्याचे अवशेष, आणि एक चौकटी आडोसा आहे.
१) कपारीच्या उत्तर टोकाला दगडात कोरलेली चौकट आहे. या चौकटीचा बैठा दर्शनी भाग (छत आणि जमिनीवरचा) पाण्याच्या माऱ्यामुळे आणि भुस्खलनामुळे नष्ट झाला असावा. ही चौकट अंदाजे १.१ मीटर लांब, ०.४ मीटर रुंद आहे. याच्या पाठ टेकवायच्या उभ्या भिंतीची उंची ०.६ मीटर आहे. ही चौकट बैठक (बाक) असावे असे वाटते.
२) चौकटीच्या दक्षिण बाजुस, एक अर्धवट दंडगोलाकृती लेण्याचे अवशेष आहेत. या लेण्याचा दर्शनी भाग (छत आणि जमिनीवरचा) पाण्याच्या माऱ्यामुळे आणि भुस्खलनामुळे नष्ट झाला असावा. या लेण्याच्या अवशेषाचा आकार १.९ मीटर लांब, ०.५६ मीटर रुंद, आणि १.८ मीटर उंच आहे. जमिनीवरच्या वर्तुळाचा फक्त २५ % भाग शिल्लक राहिला आहे. या भागात छत कोसळल्याच्या स्पष्ट खुणा आहेत.
३) या लेण्याच्या दक्षिणेला, कपारीच्या आतल्या भागात एक चौकटी आडोसा आहे. याचे जमिनीवरचा आकार १.४२ मीटर १.९ मीटर आहे. तर उंची १.८ मीटर आहे. आडोस्याच्या दर्शनी भागात एक फुट आकाराचा विभाजक आहे.
४) आडोस्याच्या बाजुला एक बैठक (बाक) आहे. ही बैठक अंदाजे १.९ मीटर लांब, ०.७६ मीटर रुंद आहे. याच्या पाठ टेकवायच्या उभ्या भिंतीची उंची ०.७६ मीटर आहे. तर बैठक जमिनीपासुन अंदाजे ०.८१ मीटर उंच आहे.
५) या बैठकीच्या दक्षिणेला बाजुलाच एक अजुन उंच बैठक आहे. ही बैठक अंदाजे ४.२ मीटर लांब, ०.९ मीटर रुंद आहे. याच्या पाठ टेकवायच्या उभ्या भिंतीची उंची १.१५ मीटर आहे. तर बैठक जमिनीपासुन अंदाजे १.३ मीटर उंच आहे.
At Khadakwadi Cavern Cave there are five manmade sub-elements. There are two benches, one broken bench ruin, one ruin of cylindrical chamber, and one open chamber.
1) At north end of the cavern, there is a rectangular cutting in the wall with some remains of bench on the floor. Due to erosion the section of floor and ceiling here seems to have collapsed. This probable bench is about 1.1 meter wide, 0.4 meter in breadth and the back rest is about 0.6 meter in height.
2) Further south of this ruined bench, immediately there is a ruined cylindrical chamber, The arc of the back wall at both floor as well as ceiling can be easily be noticed. Again here due to erosion the section of floor and ceiling here seems to have collapsed. This ruin is about 1.9 meter wide, 0.56 meter in breadth and 1.8 meter in height. There are clear marks that the ceiling here has collapsed as evident by many small boulders in front of this chamber.
3) Next to this chamber is a small open chamber little inside the cavern at one corner. This open chamber which is used for cooking is about 1.42 meter in breadth and 1.9 meter in length. This chamber is open in the frontal side with a small carved divider. The chamber is about 1.8 meter in height.
4) Next to this open chamber theres is a bench. The bench is about 1.9 meter wide, 0.76 meter in breadth. The seat is about 0.8 meter above the floor and the back rest is about 0.76 in height. 5) Further south there is another bench which is partly broken at one end. This bench is 4.2 meter wide, 0.9 meter in breadth. The seat is about 1.3 meter above the floor and the back rest is about 1.15 in height. This bench is extra large as compared to what is normally seen in the caves. There is a pole hole on the seat of this bench.
 

 

 
10. Bench, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
11. Open chamber and bench, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
खडकवाडी कपार लेणे मुख्य व्यापारी मार्गाजवळ नसले तरी हे कपार लेणे, बेडसे आणि येळघोळ या दोन लेण्यांच्या मध्ये आहे. हे कपार लेणे तिकोना आणि ज्ञानपुरी खिंडीजवळ आहे. बेडसे आणि येळघोळ या बौद्ध लेण्यांचा या लेण्याशी संबंध असावा. खडकवाडी कपार लेणे आणि येळघोळ कपार लेणे यातील बैठकांची (बाकांची) रचना एक सारखी वाटते. या व्यतिरिक्त खडकवाडीच्या कपार लेण्यात आढळणारे दंडगोलाकृती लेण्याचे अवशेष आणि येळघोळ कपार लेण्यात आढळणारे संपुर्ण दंडगोलाकृती लेणे यात साधर्म्य आहे. खडकवाडीच्या दंडगोलाकृती लेण्याची पडझड झाली आहे. लेण्यासमोरे पडलेल्या मोठया दगडांवरुन पडझड झाल्याचे स्पष्ट होते. मावळात अशा दंडगोलाकृती लेण्यांची कमी नाही. जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्गेस आणि एस. नागराजु यांच्या मते असे लेणे स्तुपासाठी बनवले असावे. मावळातल्या काही लेण्यात असे दंडगोलाकृती चैत्यगृह आहेत. बेडसे, भाजे येथे अशा दंडगोलाकृती चैत्यगृहात कोरलेला स्तुप आहे. तर भाजे, शिलाटणे, येळघोळ, वाळख, आणि खडकवाडी येथे अशा दंडगोलाकृती चैत्यगृहात कोरलेला स्तुप नाही. याचा अर्थ येथे दगड विटांपासुन बांधलेला किंवा लाकडाचा बांधीव स्तुप असावा. आज मात्र या ठिकाणचे दंडगोलाकृती चैत्यगृह लेणे रिकामे आहे. मावळातल्या विविध दंडगोलाकृती लेण्यांमध्ये काही स्तुप असलेल्या आणि स्तुप असलेल्या लेण्यांचा व्यास एकसारखाच आहे. मावळातल्या या दंडगोलाकृती लेण्यांव्यतिरिक्त कोकणात कोंडिवते, कान्हेरी आणि जुन्नर जवळ तुळजा लेणी येथे दंडगोलाकृती लेणे (चैत्यगृह) आढळते. खडकवाडी चे कपार लेणे बौद्ध लेणे आहे असे दंडगोलाकृती लेणी सुचवते.
The cavern is located in interior part of Pavana Maval and is not located on any major trade route. However the caves are in vicinity to the Bedse and Yelghol caves. The caves are also located close to the Tikona and Dnyanpurwadi pass. The vicinity to Yelghol and Bedse, which have been clearly identified as Buddhist caves, suggests possible association of Khadakwadi excavation with other caves of this region. The pattern in which the bench have been carved at Yelghol and at Khadakwadi has similarities.
The attempt to make a circular chamber (which is either incomplete or collapsed) is similar to what can be seen at several other caves of the region including that at Yelghol, Bhaje, Bedse, Shilatane, Walakh. The cylindrical chaityagriha with carved stupa can be seen at Bedse and Bhaje. While at Bhaje, Yelghol, Walakh, Shilatane and Khadakwadi the cylindrical chaityagriha is empty. Interestingly there are few of these cylinrical chambers with and without stupa with exactly same diameter. The cavern at Khadakwadi has partially collapsed as it is evident from the large number of rocks in front of the cavern. As the hill has hardly any other cavern or the source of rocks above high up in the hill, most of the loose rocks in the stream in front of Khadakwadi cave are generated out of the ceiling collapse and floor collapse of the Khadakwadi cave cavern itself. The chisel marks on the partial circular chamber suggests that there was a circular chamber inline with that at Yelghol. The circular chamber is located at northern end of the cavern. As per James Fergusson and James Burgess, such chambers were probably used as the place of worship (with structural or wooden stupa), as evident from several other locations in Maval. Such cylindrical chaityagriha are also seen at Kanheri, Kondivate in Konkan and at Tulaja caves near Junnar.
 

 

 
12. Open chamber, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
13. Open chamber and bench, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
14. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
15. Open chamber, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
.
 

 

 
16. Natural rock and void pattern, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
17. Natural rock and void pattern,Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
18. Open chamber, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
19. Ruined circular chamber, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
20. Ruined bench, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
21. Chiselling work at Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
22. Chiselling work at Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
23. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
24. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
25. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
26. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
27. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
28. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
29. Natural voids and rocks, Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
30. View from Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
31. Bench at Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
32. Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
33. Chiseling work on ceiling, Khadakwadi Cavern, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
34. Choti Sulak hillock and Khadakwadi cave hill range, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 

 

 
35. View from Khadakwadi cave, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India
 
 
 
 
 


For any queries and suggestions contact at kale_v@rediffmail.com